प्रेमी युगल करताहेत शहरातील सांस्कृतिक ठेव्यांचे विद्रुपीकरण; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्याच्या पर्यटन राजधानीला घरघर..!

Foto
औरंगाबादः शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहराला बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. याचबरोबर अजिंठा वेरूळ लेण्यांसारखे जागतिक पर्यटन स्थळे या शहराच्या सांस्कृतिक भरभराटीचे केंद्र आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ, दौलताबाद किल्ला, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिर, पानचक्की, बीबी का मकबरा या आणि यासारख्या असंख्य पर्यटनस्थळांमुळे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराची ओळख आहे. मात्र, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या पर्यटनास्थळांची दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

पर्यटकांऐवजी फिरायला येणार्या लैला मजुनूनीं या ऐतिहासिक ठिकाणी आपल्या प्रेमाची निशाणी लिहून त्यांचे विद्रुपीकरण चालवले आहे. दौलताबाद किल्ल्यावर अनेक ठिकाणी प्रेमी युगलांनी आपल्या नावाची आद्याक्षरं कोरल्याचे दिसून येते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असताना प्रशासनाचे मात्र, या ऐतिहासिक वारशांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फिरायला येणारे पर्यटकांना त्यांनी सोबत आणलेल्या पाण्याच्या बिसलरी टाकण्यासाठी  कुठलीही व्यवस्था नसल्याने या पाणी बाॅटल ते अस्ताव्यस्त फेकून देतात. यामुळे किल्ल्याच्या परिसरात पाण्याच्या बाटलांचा खच साचलेला दिसुन येतो.

 पर्यटन व्यवसायाचे वाढते महत्व व लोकांचा पर्यटनाकडे वाढता कल पाहता पुरातत्व विभाग व पालिका प्रशाषनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या पुरातन वास्तुचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना या दोन्ही विभागाच्या हलगर्जीपणामुळे पर्यटक या पर्यटन राजधानीकडे पाठ फिरवतात की काय अशी परिस्थिती आहे.

विमान सेवेचा प्रश्नही प्रलंबित 
चिकलठाणा विमानतळावरून सुरू असलेल्या विमानफेर्या देखील मागील काही महिन्यापासुन घटल्या आहेत. यामुळे शहरातील पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आपले लोकप्रतिनिधी शहराच्या पुरातन ठेव्याविषयी किती दक्ष आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

नागरिकांच्या सामाजिक जाणिवा बनल्या बोथट..!
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरातील पुरातन वास्तुंची जपणूक करणे ही सर्वसामान्य नागरिकांची देखील जबाबदारी असुन या पुरातन वास्तुंचे विद्रुपीकरण न करण्याचे भान नागरीकांना कधी आणि  शहरातील नागरिकांच्या सामाजिक जाणिवेच्या कक्षा कधी रूंदावणार हे प्रश्नही अनुत्तरितच आहेत. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker